सरपंचांना हे अधिकार

जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांना हे अधिकार असणार आहेत

सरपंचांना हे अधिकार असणार आहेत

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959 मधील कलम 33 नुसार सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणूकीची कार्यपध्दती विषद करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने खालील सुचना देण्यात आलेल्या आहेत तरी आपण पूर्ण वाचावे ही विनंती.

सरपंच निवडणूक अधिकार

  1. उपसरपंच पदाच्या निवडणूकीमध्ये पहिल्या फेरीत सरपंच यांना मतदानाचा अधिकार असेल व सदर निवडणूकीमध्ये समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क असेल.
  2. उपसरपंचाची निवडणूक ही सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेणे व उपसरपंच यांची निवड करणे कायदयाने बंधनकारक असल्याने उपसरपंच निवडणूकीचे अध्यक्षस्थान भूषवून त्याप्रमाणे कार्यवाही करणे हे सरपंच यांच्या कर्तव्याचा भाग आहे.
  3. उपसरपंच पदाची निवडणूकीची सभा तहकुब झाल्यास मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, 1964 च्या नियम 12 मधील तरतुदीनुसार सदरची सभा त्या कारणासाठी दुसऱ्याच दिवशी तात्काळ घेण्यात यावी.
  4. उपसरपंचाच्या निवडणूकीकरीता अपरिहार्य कारणास्तव सरपंच उपस्थित राहण्यास असमर्थ असतील तर जिल्हाधिकारी यांनी सदर कारणाची खातरजमा करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959 चे कलम 33 मधील पोट कलम 6(4) मधील तरतुदीस अनुसरुन तात्काळ पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करावी. जेणे करून विहित कालावधीमध्ये पंचायतीचे गठन होणे शक्य होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top